Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sujit Falke

Abstract Drama Tragedy

4  

Sujit Falke

Abstract Drama Tragedy

बदली एक स्वप्न

बदली एक स्वप्न

1 min
283


सोप्या अवघडचा येथे मोठा घोळ आहे

प्रशासन,संघटना,नेत्यांचा एकत्रित झोळ आहे //


ऱाबराब राबतो वाडी वस्तीचा शिक्षक येथे

त्यांच्या कष्टाला ,घामाला कुठे येथे मोल आहे?

पैसाच्या लाचा, नेत्यांची मक्तेदारी चहूकडे

संघटनेचे हिरे येथे अनमोल आहे //


वर्षानुवर्षे स्वप्न बदलीचे असते उरी

आईवडील,बायकामुले याचा कुठे मेळ आहे ?

कुंपणच येथे शेत खातय भोळ्या मास्तरा

दिव्याखाली दाटला भयाण आंधार आहे //


काय चूक केली शिक्षक होऊन आम्ही ?

सिस्टीमच येथील पुरती बरबाद आहे

सोप्याच अवघड अन अवघडच सोप

यांच्या हाताचाच हलका मैल आहे //


पगार असून नाही समाधानी येथे कोणी

कुटुंबात राहण्याची बुडली कर्म कहाणी

देव पाहतो ना सगळे डोळे बंद करुन

पाहु आता कित्येकांचे गुन्हे येथे माफ आहे //


छळछावणी लाऊन काय मिळते तुम्हाला ?

किती तरी दु:खे आमच्या पुढ्यात आहे 

नौटंकी दिखावा पुरे झाला लागोलाग आता

येथे विचार नीती अन विवेकाचा आहे //


नका करु इतका विचार तुम्ही आमचा

फायदाच तुमचा अन त्यांचा यात आहे

सोप्या अवघडाचे सूत्र मांडून तुम्ही

शिक्षक समाजाची लावली पुरेपूर वाट आहे //


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract