STORYMIRROR

Sujit Falke

Tragedy Thriller Others

3  

Sujit Falke

Tragedy Thriller Others

रक्ताळलेला सन्मान

रक्ताळलेला सन्मान

1 min
154

शमविण्या आपल्या लालसेची तृषा,

रक्त जाळले भक्तीचे सुर्यातळी,

डंभ,अहंकार अन नितिशुन्यता पहा

अन्न पाण्याविना भक्ती होरपाळली //


मोल कौतुकाचे जीवानीशी गेले

सामान्यांच्या भावनांचे राजकारण झाले,

पुरस्कार माखला रक्ताने असा काही

प्रत्येक क्षण आता तिरस्काराने नाहले//


भक्त प्रल्हाद पहुडला आज सुर्यज्वालात सदा,

अवतार नरसिंह का धावला नाही?

भक्तिच्या समजण्या व्याख्या चुकलो आम्ही

देव मानसातला कधी दिसलाच नाही.//


अंतिम प्रवास स्तब्ध झाला वादळी

मोल श्रद्धेचे नितिशुन्य जगास भासले,

देवात्वाच्या भ्रमात इहलोकीच्या

भुत वर्त भविष्य पिढ्यांचे कळी भक्ष्यस्थानी आले//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy