STORYMIRROR

Sujit Falke

Abstract Tragedy

3  

Sujit Falke

Abstract Tragedy

बेधुंद लोकशाही

बेधुंद लोकशाही

1 min
165

जनता राज्याची इथे झाली वेश्या ,

राज्यकर्ते लुटारू काळ्या रात्रीचे,

दररोज पिळवटुन अब्रू निनावी,

शून्य हुंकार आंतरिक आक्रोश आहे ,

सांग देवा तु का निष्ठुर एवढा शांत आहे //


नवा खेळाडू नवी लुटमार

म्हड झेलतय जनतेच तोच अत्याचार ,

परिस्थितीचे लाचार जिने आता

सोरटी, सोंगाडी, बाजारु ,खेळाडुंचा

माजला हाहाकार आहे,

सांग देवा तु का निष्ठुर एवढा शांत आहे //


सत्तेचा माज अन नशा करोडांची

नितीचा घोटुन गळा विकली अब्रू मत्तेची

लालसेची शमविण्या भुक

गहाण येथे ठेवला स्वाभिमान आहे

सांग देवा तु का निष्ठुर एवढा शांत आहे //


करंट कपाळ अन करंटीच आशा,

येइल का कधी एखादा दिवस सुखाचा?

हातातोंडीचा घास मुखाचा

कसा इथे पाहा मातीमोल होत आहे.

सांग देवा तु का निष्ठुर एवढा शांत आहे //



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract