STORYMIRROR

Sujit Falke

Abstract Inspirational Others

3  

Sujit Falke

Abstract Inspirational Others

मी एक शक्तिशाली

मी एक शक्तिशाली

1 min
198

स्वप्नाचे असे पंख माझे

आकाश ठेंगणे झाले जगी


पाहून माझी इच्छाशक्ती

सागराला ही वाटे भिती


लौकिक माझ्या तेजाचा

सुर्यकिरणे झाकळती 


शौर्याचे करता वर्णन

विजेची झाली मंदगती


कारुण्याचा भाव जगता

धो धो बरसती आम्रसरी


माया माझ्या ह्रदयाची 

न तोले भार धरा क्षणभरी


धैर्य अचाट दिसता समोर

पर्वत माना झुकवती


प्रेमाचा माझ्या शोध घेण्या

नद्यांची झाली धारा उलटी


पाहण्या माझी दिव्य कांती

चंद्रसुर्य एकरुपे प्रकटती


आत्मविश्वास माझी शक्ती

म्हणून मी काळाचा अधिपती


सुंदर रमनी ही भव्यसृष्टी 

सामर्थ्यवान हीचा मी प्रजापती        


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract