STORYMIRROR

Sujit Falke

Abstract Tragedy Others

3  

Sujit Falke

Abstract Tragedy Others

भूलथापा

भूलथापा

1 min
175

अरे वेड्या किती कष्टतो ?

 दे सोडून हे काम रे 

चल माझ्या बरोबर 

दाखवतो प्रगतीची वाट रे //


निवडून फक्त येउ देत मला

 दे फक्त तु साथ रे

कायापालटच करतो पंचक्रोशीचा 

करतो उद्याची बात रे //


पक्की घरे ,वीज ,रस्ता ,

निर्मल पाणी, शेताशेतात पाट रे

कशाला मागे राहायच दोस्ता ?

धरु प्रगतीची कास रे //


भुलथापांचे बीज सोनेरी 

कशी लावतय तुमची वाट रे ?

विकास ,प्रगती ,उन्नती ,

परिवर्तन हे फक्त शब्द कोशात रे //


पैसा ,सत्ता,उद्योगधंदे 

आमच्या पिढ्यांची चाल रे

एक दिवसाचा राजा तु

 बाकी पाच वर्षे गुलाम रे //


महिना भर नाही विझनार 

ईस्टेटची आमच्या आग रे

तुझेच पैसे काढण्यासाठी 

तुम्हा रगडावे लागेल नाक रे //


पगार पेंशन बखळ आम्हाला

 तुमचाच हा प्रताप रे

लाचारीचे जीवन तुमचे

 पडून रहा दारात रे //


आम्हीच आता राजे तुमचे 

लोकशाहीचे फक्त नाव रे

सुशिक्षित आडानी वेड्यांच्या

 दुनियेत यशस्वी आमचीच चाल रे //


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract