अभिष्टचिंतन
अभिष्टचिंतन
तुझ हसण जणु
शारदीय चांदण,
तुझ बागडण जणु
मोत्यांची रास अंगणी,
तुझा लाडीकपणा जणु
प्रेम सरी अंतरी,
तुझ चालण जणु
मोर लाजरा हिरव्या रानी,
कुशीत पहुडण तुझ
स्वर्गीय सुख जगी,
रुसण माझ्यावर जस
रखरखत उन वाळवंटी,
हट्ट असा साजरा जसा
मोती शिंपल्यातला,
निरागस चेहरा निर्मल
जसा नंदादीप देवालयी,
बोलबोबडे असे काही
मोहनी पडे सर्वांनाही,
तुझ्या असण्याने जणु
स्वर्ग सुखाची अवीट गोडी,
देवकृपा मोठी तुझ्यावर
रास सुखाची मिळो तुला जन्मभरी
