STORYMIRROR

Sheetal Sankhe

Abstract

1.4  

Sheetal Sankhe

Abstract

शब्द कुणाचे सांग ना ...!!!

शब्द कुणाचे सांग ना ...!!!

1 min
27.5K


शब्द कुणाचे सांग ना ...!!!

अधांतरी मनात रेंगाळणारे

क्षणोक्षणी तुजसाठी बरसणारे

तुझ्याच भवती फिरणारे ...

शब्द कुणाचे सांग ना ...!!!

प्रतिभा तुझीच जपणारे

अस्मिता माझी रेखणारे

तुझ्याचसाठी विरहात झुरणारे ...

शब्द कुणाचे सांग ना ...!!!

कवितेतून काव्यात गुंफणारे

तुझ्यातून माझ्यात मुरणारे

प्रेमातून प्रेमग्रंथ होणारे ...

शब्द कुणाचे सांग ना ...!!!

सख्या अमृतकुंभ वाटणारे

अक्षय सुखी करणारे

आजन्म साथ देणारे ...

शब्द कुणाचे सांग ना ...!!!

तूच तुझ्या शब्दात उरणारे

असेल नसेल कधीही न संपणारे 

तुझे शब्द हृदयात कायम साठणारे ....

  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract