मी लाभार्थी... असा
मी लाभार्थी... असा
मी लाभार्थी
कायद्याने काय द्यायचं
हे न समजलेला
त्यामुळे कष्टानेच
कामे पूर्ण केलेला
मी लाभार्थी
कागदावरच्या सार्या
सुविधा न घेतलेला
त्या सार्या मेहनतीने
उपभोगलेला
मी लाभार्थी
लॉटरी तिकीट कधीही
न जिंकलेला
घामाच्या पैशावर नेहमीच
टॅक्स भरलेला
मी लाभार्थी
फुकट गोष्टीकडे
दुर्लक्ष केलेला
प्रामाणिक सेवेत
समाधान मानणारा
मी लाभार्थी
तत्वाशी तड़जोड़
कधीही न केलेला
अवघड़ वाट एकटाच
चालत आलेला...
