हे प्रभो..
हे प्रभो..
हे प्रभो मज प्रकाश दे तू, पाऊलांपुरताच पथ चालतांना
पंख दिले तर बळही दे त्या, गगनभरारी मारतांना....
इतुकेच मिळू दे पोटापुरते, भुक जिथे छळणार नाही
इतुकेही तू देऊ नको की, बरे वाईट कळणार नाही
हात जोडुनी विनविते तुज, मागणे हे मागतांना.......
दीनदुबळ्या पिडितांना आधार देण्या मज ताठ कणा दे
दुष्टदुर्जनां अधमांना परी, शासण्यास मज विष फणा दे
सुमती दे तू शुद्धमती दे, कलियुगात या वावरतांना.......
मजसी रोखण्या सरसावतील बहू, सत्य मार्ग ना रूचे कुणा
तरी न ढळावी श्रद्धा माझी, असाच राहो चांगुलपणा
थकले हरले जर चालतांना, तुच उभारी देई पुन्हा..!
हे प्रभो मज प्रकाश दे तू पाऊलांपुरताच पथ चालतांना...
