सलाम सैनिक हो
सलाम सैनिक हो
सैनिक हो सलाम तुम्हाला
सीमेवर असता तुम्ही देशाच्या रक्षणासाठी
सैनिक हो माझा हा सलाम तुमच्यासाठी...
झोपतो सुखाने आम्ही जागता तिथे तुम्ही
डोळ्यात तेल घालून पहारा त्रिकाळ तिन्ही
जगता दूर तिथे तुमचा संसार ठेऊन पाठी...
भुमातेच्या चरणाची लावून माथी माती
लढता घेऊन शीर सदैव तळहातावरती
जयजयकार सदा भारतमातेचा तुमच्या ओठी...
कापून मरावे की मरतानाही शत्रूस कापावे
याविण काही अन्य तुम्हा दुसरे न ठावे
देशासवे तुमच्या बांधिल्या जन्ममरणाच्या गाठी...
देशरक्षण्या लाभावे बहुत आयुष्य तुम्हा
मागणे इतुके एकच हे परमेश्वराने द्यावे आम्हा
सैनिकहो सलाम तुम्हाला या मातेचा त्यासाठी...
