STORYMIRROR

VINAYAK PATIL

Inspirational

3  

VINAYAK PATIL

Inspirational

कष्टाची भाकर

कष्टाची भाकर

1 min
298

अहोरात्र राबे बाप माझा

विसावा न घेई क्षणभर 

जरा चाखून तरी बघा 

माझ्या कष्टाची भाकर 


काळ्या मायेची आम्ही लेकरं 

शेतामंदि पिकवतुया सारं 

नाही चीज नाही पनीर 

भाकरीला न लावी बटर 


सोबतीला ठेचा अन पोटभर भाकर 

कधी नाही वाढणार तुमची शुगर 

घाम गाळुनी फुलवी मी शिवार 

निसर्ग करी शिवाराची चाकर 


जीवा शिवाची जोडी ओढती नांगर 

माय दळती पीठ घालूनी जवार 

छोटासा आमचा सुखी संसार 

चाखून बघा कष्टाची भाकर 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational