Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

VINAYAK PATIL

Abstract Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Others

गंध‌ मैत्रीचा

गंध‌ मैत्रीचा

1 min
188


मैत्रीच्या आठवणी

दडल्या मनात

आठवण येई तुझी 

प्रत्येक क्षणात||१||


कायम पाठीशी

असे तुझाच विश्वास

माझ्या जीवनाचा

तूच असे खरा श्वास||२||


तुझी माझी मैत्री

आहे एक आठवण

मनात दडली

आयुष्याची साठवण||३||


अनमोल जीवनात

तुझाच आधार

तुझ्याविना मित्रा कसा 

होई निराधार||४||


जीवनी जपली 

आठवण ही मैत्रीची 

एकमेव गोष्ट

असे माझ्याच खात्रीची||५||


कसा वर्णवू शब्दात

मैत्रीची थोरवी

मित्र माझा हा महान

मित्रास गौरवी||६||


गंध मैत्रीचा असा

खूपच अनमोल

साथ निभवी सदा

जीवनी बहुमोल||७||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract