सावली
सावली
जीवन जगताना
साथ मोलाची लाभली
लेकरांची सावली
मायबाप||१||
कुटुंबाचा आधार
कष्ट करतो दिनरात
भेगाळले हात
बाबांचे||२||
पोरा बाळांसाठी
सदा राहिला झटत
नाही थकत
कधीच||३||
खंबीरपणे पाठीशी
उभा सदैव राही
यशोकीर्ती पाही
लेकरांची||४||
एकाएकी अचानक
प्राणज्योत ही मानवली
हरवली सावली
आधाराची||५||
सहवास आठवणींचा
आता उरला मनात
राहिल्या आयुष्यात
आठवणी||६||