STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

सल

सल

1 min
129

वाट शांत वळणांची

किती निर्जन भासते

घेई झुणका भाकर

सखी बिगीनं चालते


मनी जंजाळ प्रश्नांचे

कसे सोडवू कळेना

अनवाणी पावलांना

उष्ण जाळ साहवेना


काटा रुतला पायात

कळ उठे काळजात

देव तरी असा कसा

काटा ये मम मार्गात

 

मागे वळून पाहता

कारभारी दिसतसे

बघताच सखयेला

खास गोड हसतसे


काटा हळू काढताना

प्रीत वल्लभाची कळे

स्पर्श मऊ रेशमाचा

सल कसा विरघळे


रीत प्रीतीची अशीच

दुःख पुसून टाकते

सल टोचले कितीही

माया मनास भावते



రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Abstract