STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

पुत्र व्हावा ऐसा

पुत्र व्हावा ऐसा

1 min
134

येती शुद्ध बीजापोटी

फळे रसाळ गोमटी

शूर वीर पराक्रमी

धन्य माऊली जगती


पोटी संस्कार मातेचे

पुत्र असाच जन्मावा

शस्त्रविद्येमधे शूर

पिता आदर्श असावा


देश धर्माचे रक्षण

पुत्र करी जीवापाड

हात भगिनींवरती

सत्वरेच घाली धाड


राज्य नित्य वाढवणे

धर्म नाही बदलणे

" मेलो तरी बेहत्तर "

पुत्र म्हणे अभिमाने


पुत्र अमर संभाजी

धन्य त्याचे माता पिता

लाभे मरण यशाचे

जन्म सार्थकी लागता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract