शब्दांचे मोती
शब्दांचे मोती
शब्दांचे मोती गुंपित जाऊ
शुद्धचित्त पारदर्शक मनाने
घरसंसार सावरूया आपुले
शब्दस्वरूपी अमृती बोलाने
घरात पसरवूया प्रेम पसारा
क्रोधी परतवून लावू नक्की
सामंजस्याचे जाळे विनुया
खून गाठ बांधू मनी पक्की
एकमेकांवरी श्रद्धा ठेवुनी
विश्वासी धागे पक्के करू
आदर ठेवु थोरा मोठ्यांचा
स्नेह धारेची वाट अनुसरू
शब्द प्रेमाचे सर्वोच्च डोंगर
जपुनी वापरणे आपले कर्म
शब्दच मनीहृदयी टोचणारे
मानावांनो, जाणून घ्या मर्म
शब्दाने साधा मधुर संवाद
तीक्ष्ण शब्दांना तिलांजली
संसारगाढा स्वर्गमय होईल
शब्द रूपी मोती अनमोल
