कोकण
कोकण
महाराष्ट्राच्या भूमीवर जणू हे नंदनवन
मुक्तहस्ताने करतो निसर्ग इथे उधळण
नद्या वाहती येथे खळखळून,वाहतात झरे
ही संगीत सुमधुर होऊन, पिकेही डोलती बहरून
सर्वत्र हिरवीगार झाडे अन् रंगीबिरंगी फुले
नदीकाठी खेळतात इथे लहान मुले
फळांचा राजा आंबा हापूस इथेच तर पिकतो
कोकणचा निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो
वादळ आले तरी उंच डोंगर हात
पसरून त्यांना सामोरे जातात
प्रत्येकाला कठीण परिस्थितीला
सामोरे जाण्याची जणू प्रेरणा देतात
कोकणातले गड किल्ले ही सांगतात
कोकणचा इतिहास
पृथ्वीवर होतो जणू स्वर्गाचा भास
अथांग निळाई, गर्द वनराई
काजू, फणस,नारळ इ. बागा
चैतन्याची ही नवलाई
विविध रंगाची कोकणातली मनमोहक हिरवाई
कोकण भूमी ही महान देशभक्तांची
हृदयात गोडवा असणारया साध्या सरळ माणसांची
वाटते नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या
या भूमीच्या कणाकणात बेधुंद होऊन जावे
गंध त्याचे हे आगळेवेगळे प्रत्येक श्वासात भरून घ्यावे
निर्मात्याच्या आविष्काराचे प्राणपणाने
सर्वांनी जतन करावे...🙏😊
