मन..
मन..
मन हे मन असतं तुमचं आमचं सेम नसतं.
कुणाचं बागायती, कुणाचं कोरडवाहू
कुणाचं गुलमोहर कुणाचं निवडुंग
प्रत्येकाचं आकाश वेगळं,
प्रत्येकाचा पाऊस वेगळा.
मनाची स्पेस ठरवते शरीराची स्पेस.
शरीराने दूर असलेले मनाने जवळ असतात.
मनाने जवळ असलेले शरीराने दूर असतात.
निसर्गात रंगाची उधळण कशी होते याला तार्किकता नाही.
मन कुणाच्या अंतरंगात रंगेल यालाही तार्किकता नाही.