STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

मन

मन

1 min
149

मन हे मन असतं 

तुमचं आमचं सेम नसतं

कुणाचं बागायती

कुणाचं कोरडवाहू

कुणाचं गुलमोहर

 कुणाचं निवडुंग

प्रत्येकाचं आकाश वेगळं,

प्रत्येकाचा पाऊस वेगळा

 मनाची स्पेस ठरवते 

शरीराची स्पेस

शरीराने दूर असलेले

 मनाने जवळ असतात

मनाने जवळ असलेले 

शरीराने दूर असतात

निसर्गात रंगाची उधळण 

कशी होते याला तार्किकता नाही

मन कुणाच्या अंतरंगात रंगेल यालाही तार्किकता नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract