पार
पार
सगळं पार करता येत नाही आयुष्यात
काही पार आवाक्याबाहेरचे
सगळ्यांना पार करायचंय एकमेकांना
पार करताना पार वाट लागली
तरी चालेल इतक्या निष्कर्षाप्रत
येऊन पोहोचली आहेत माणसे
सगळ्यांनाच पार करायचय
आवाक्याबाहेरचं क्षितिज
सगळ्यांना पार करायचंय यशोशिखर
नैराश्याच्या नंतरचा कडेलोट ही पार करायचा अनेकांना
समाधानाच्या थांब्यावर थांबायला
कुणालाच वेळ नाही
सगळ्यांना जिंकायची आरपारची लढाई
सगळ्या गोष्टी पारदर्शक असल्या तरीही
स्वतःचा पारदर्शकपणा पार
करायला कुणालाच आवडत नाही
उतसुकतेचं दुसरे नाव पार
एक पार संपला की दुसरा पार
पार एक माईल स्टोन
प्रवास पार पाडण्यासाठी
एक क्षणभर विश्रांती चे स्थान.