श्रावण
श्रावण
श्रावण म्हणजे भावभावनांचा सुखोस्तव
काळरात्र नंतर येणारा उष:काल
ऊन-पावसांचा मिलनोत्सव
पृथ्वीच्या सजण्याचा, नटण्याचा उत्सव
हिरवा शालू नेसण्याचा उत्सव
पृथ्वीनं पांघरलेलं मलमली तारुण्य
क्षणात आहे क्षणात नाही असं नक्षत्राचं देणं
मनाचा गुलमोहर होणं,मनाचा प्राजक्त होणं
शरदाच्या चांदण्यात प्रतिभा नहाणं
पावसाच्या सरी बरसताना प्रियआठवणं
श्रावणात ही घडी अशीच राहू दे वाटणं
प्रत्येकाच आकाश असतं, प्रत्येकाचा अवकाश असतो
प्रत्येकाचा श्रावण असतो, प्रत्येकाचा इंद्रधनू असतो
मनात इंद्रधनु अवतरतो, मनमोराचा पिसारा फुलतो
तोच खरा श्रावणअसतो
दुष्काळा नंतरचा ऋतु बरवा
ऋतु हिरवा म्हणजे श्रावण
फुलासारख स्वतः तून उमलून आसमंत
दरवळणं म्हणजे श्रावण