मुक्ती
मुक्ती
जीवनाची मला आसक्ती
नकोच आहे मला मुक्ती
भाग्याने गोत लाभले
सहवासाने तृप्त झाले
मुले सुना सुस्वभावी
नातवंडांची मला गोडी
मुक्तीचे नारे का वाजवायचे?
वाट काढतंच स्वतःसाठी जगायचे
मुक्ती मिळवली तर क्षणिक समाधान
संधीकालात कोण बरे देईल मला मान?
हातात हात द्यायलाही माणसेच हवीत
कर्तव्यपूर्तीतून मिळवायला हवीत
ठेविले अनंते मी सुखी आहे
सर्वांची साथ साफल्य आहे
