आयुष्य एक रंगमंच
आयुष्य एक रंगमंच
आयुष्य एक भव्य रंगमंच
संसार पटली विराजमान
विविध भूमिका वटविण्या
कलावंतश्री मानव महान
आपण हो कटपुटली नट
दोरी परम यंत्रणेच्या हाती
जसे नाचवी परम नियती
नशिबी त्यानुरूपे भटकंती
पूर्व जन्मांती गुणदोष ठायी
त्यांवये प्राप्त मानवी जन्म
कर्मांवये नाट्य पात्र प्राप्त
चिंतनांती जाणून घ्या मर्म
आयुष्यात असंख्य भूमिका
लागतीया रंगमंची वटवाव्या
येथे बहु नायक खलनायक
कर्मती आविष्कार कराया
अंतरंगातून कर्मे घडती
बरेवाईट पटलावर येती
संस्कारे सुकर्मे दुष्कर्मे
जशी कर्मे तशी परिणीती
समजुनी अध्यात्मिक सार
पारदर्शक आचार विचार
अभिनयातून करा साकार
हेचि पुण्य फलीताचे सूत्र
