माझा देश
माझा देश
हा देश माझा याचे ठेवा भान
संस्कृतीस जपूनी वाढवू मान
या देशी लाभले असंख्य वीर
शिवाजी, राणा, अर्जुन धनुर्धर
संत तुकोबा, ज्ञानदेव, महावीर
थोर वीर साधू संतांची धरोवर
भारतीयांचे प्राचीन शास्त्र ग्रंथ
अनंत सुपुत्रे जाहली ज्ञानवंत
गौरवात्मक शौर्यगाथा इतिहासी
ख्याती या देशाची, इतिहास साक्षी
डोंगर पर्वत वने सरोवरे नद्या नाले
काळया मातीतून पीक खूप डोले
पूर्णत्वाची खान ही आमची शान
जगी ओळख, भारत देश महान
