अबोध प्रित
अबोध प्रित
वडीलाशिवाय कुटुंबाला
पूर्णत्वाचे आवरण नाही
कर्ता-धरता वडिलांची
अबोध प्रित कळलीच नाही
तापट, रागीट अशीच प्रतिमा
प्रत्येक कुटुंबी रुजविली
टणक प्रतिमेतील प्रेम
कुणीही जाणलेच नाही
लाडक्यांच्या भल्यासाठी
वडील रागावतातही बरं
आप्तांच्या उन्नतीसाठी
खस्ता खातात हे ही खरं
आईत दिसली ममता
वडिलात दिसली नाही
कर्ता-धरता वडिलांची
अबोध प्रित कळलीच नाही
