भिमतारा
भिमतारा
चौदा एप्रिल या दिनी
भीम तारा हा अवतरला
दिव्य तेजाने आपुल्या
साऱ्या जगास दिपावला
होते मागासवर्गीय कैवारी
होते मानवतेचे पुजारी
मागासलेयांच्या उत्थाना
रात्रंदिन कष्ट करी
खूप वाढविली विद्वत्ता
दूर सारण्या विषमता
ज्योत ज्ञानाची पेटवूनी
दूर सारीले अज्ञानी
किर्ती त्यांची अमर आहे
प्रेरणा त्यांची जिवंत आहे
अदर्शाच्या पाऊल तत्वाने
मागासवर्गीय पुढे आहे
