कलयुगी असर
कलयुगी असर
माणूस किती पिसाळलेला
किती विकृत झालेला
किती शिरजोर बनलेला
माणुसकीच हरवलेला...
खुलेआम लुटमार, चोऱ्यामाऱ्या
खून बलात्कार, निष्पापाचे चित्कार
जालसाजी, ठगबाजी, धोंगबाजी,
सोंगबाजी, बुवाबाजी, घोटाळेबाजी,
असंख्य प्रकार दिसती पृथ्वीतलावर...
नात्यातील ओळख झाली धूसर
आप्त, रक्त नात्यांचा पण विसर
हाच असावे काय? कलयुगी असर...!!
