एड्स
एड्स
एच. आय. व्ही. विषाणू
तनात प्रवेश करुनी
संरक्षक पेशींवर हल्ला करुनी
रक्त पेशींचा नाश करती
असुरक्षित लैंगिक संबंधाने
असतो संसर्गाचा धोका
नैतिकता पाळूनी, निरोध वापरून
भयानक एड्सला रोखा
या विषाणू बाधित व्यक्तीने
रक्त कुणास देवू नये
त्यांच्या जीवन मरणाशी
आपण खेळ खेळू नये
होतो एड्स मातेकडून
होतो एड्स दूषित सुयातून
सज्ज रहावे एड्स रोखण्या
उच्चाटन करण्या या देशातून
