ऋतुराज वसंत
ऋतुराज वसंत
वसंत ऋतूची महत्ती न्यारी
कवी कल्पना पडती अपुरी
शब्द खजिना पडतो अपुरा
वसंतात श्रुष्टी नटली सारी
चाहूल लागताच वसंताची
आगमन करिती नवबहार
वसंताची वधू सजविण्यास
सुसज्ज असती सौंदर्यकार
सर्वच वटविती स्वभूमीका
कसर न ठेवी मुळी पश्चात
सर्व उधळती रंग आपुले
श्रुष्टी नव वधुवत तोऱ्यात
हिरवी झाडी आम्र अमराई
कोकिळांची कुंहु कुंहु कर्णी
अन्य पक्ष्यांची किलबिल भारी
आनंदे घेती आकाश भरारी
पुष्पराज वाढवी अति शोभा
विविध रंगी पुष्पे रानोरांनी
मंद मदमस्त खुशबू तयांची
जसे अत्तर शिंपलिया कोणी
हवेची झुळूक मंद पावले
सुंगध दरवळी चहू दिशा
वृक्षवेली झोके घेण्यात मग्न
मानवी नवचैतन्याची आशा
वसंते गोडी संपता संपेना
हवाहवासा वाटतो वसंत
हेवा वाटतो मानवी जीवना
सर्वांच्या आयुषी येवो वसंत
