धडपड
धडपड
संसारी जीवन फुलले आपुले
जीवनास योग्य वळण देऊया
आकार देण्या सुंदर जीवनाला
प्रयत्नरुपी धडपड करूया
उद्देश समजुनी या जीवनाचा
ध्येय निश्चित आपुले करूया
संकल्प करूनी परिश्रमाचा
प्रयत्नरूपी धडपड करूया
वाट असेल काटेरी खडतर
तरी स्व मनोबल उंच करूया
यशो शिखरावरी चढण्यास
प्रयत्नरूपी धडपड करूया
