लोटांगण
लोटांगण
लोटांगण घातलेले पाय तेच होते का?
जे कारागृहात बंदिस्त झाले
फटाक्यांनी भरलेले अननस
देणारे, संतांना काठीने मारणारे हात तेच होते का?
गुडघ्यानी मरेपर्यंत मान दाबणारे पाय तेच होते कां?
घाण्याच्या बैलाच्या जागी माणसाला जुंपणारे
हृदय तेच कां?
गॅस चेंबर मध्ये गुदमरून मारणारें मन तेच कांं?
शब्दांचे संदर्भ बदलतात माहीत होतं, पण अवयवाचे सुद्धा संदर्भ बदलतात
प्रतिमा दुभंगत नाही तो पर्यंत माणसे देवंच असतात
आदर्श आणि आदर्शाच्यांचे पुतळे जोपर्यंत
उधवस्थ होत नाहीत तोपर्यंत माणसे आदर्शच असतात
न्यायदेवता आंधळी असते म्हणून अनेकांनी न्याय स्वतःच्या हातातच घेतला आहे
गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत उजळ माथाआहेच
तडा गेलेल्या श्रद्धेला अंधश्रद्धेचे सिमेंट लावणं बंद व्हायला हवं.
दगडाला शेंदूर फासणं आता बंद व्हायला हवं
दुःखाने आता मन ही गहिवरून येत नाही.
