झगमगती दुनिया
झगमगती दुनिया
झगमगती दुनिया
कशी बाई पडे भूल
येतो परत सांगून
बाळ कसा देई हूल
झगमगती दुनिया
दाखवतो तुम्हांलाही
आश्वासने भरघोस
प्रत्यक्षात काही नाही
झगमगती दुनिया
आम्हां नाही बघायची
बाळा ये रे लवकर
जीवाची नाही शाश्वती
झगमगती दुनिया
एक मृगजळ होते
आई बाबांच्या प्रेमाला
लेकरु पारखे होते
पश्चात्ताप मनी होई
अंधार दाटे भवती
झगमगती दुनिया
काळाचीच भूल होती
