हास्य
हास्य
तळपता सूर्य माथ्यावरी
बांधलंय तुला छातीवरी
हसू पसरलं गालावरी
हसते तुझ्या बरोबरी
डोंबाऱ्याचे खेळ करतो
पोटाची खळगी भरतो
डमरुची मजा करतो
बाळ माझा खुशीत हसतो
दारिद्र्य बांधलंय पाठीवरी
उन्हाची झळ डोक्यावरी
खेळतोस माझ्या अंगावरी
हसू खुलतंय चेह-यावरी
क्षणात मी विसरले सारे
हसऱ्या छबीत भान हरे
खेळाची ही दुनिया रे
आवरावी लागते माया रे
वाढवीन तुला कष्टाने
फुलवीन तुला मायेने
हास राजा आनंदाने
मोठा होशील भाग्याने
