स्वागत नव्याचे
स्वागत नव्याचे
वर्षानुवर्षांच्या
जुन्या परंपरा
झाल्या कालबाह्य
सर्वांनी विसरा
जुने जुने सदा
नका कवटाळू
नव्या विचारांचा
परामर्श घेऊ
स्वागत करुया
नव विचारांचे
परिस्थितीजन्य
नव बदलांचे
काळ बदलतो
पिढी बदलते
नवविचारांची
दिशा बदलतो
सावध पावले
काळाची ओळखा
लवचिकतेची
मनी जाण ठेवा
नव बदलांचे
स्वागत करता
ऐक्य विचारांचे
बघता बघता
