इच्छा तिथे मार्ग
इच्छा तिथे मार्ग
शाळा तिची आता बाप
बंदच करणार होता
काय करावे काही तिला
मार्ग दिसत नव्हता
शेतीची कामे तिला
करायचीच नव्हती
आईचीही इच्छा तिला
शिकवायचीच होती
तिला शिकवायचा
आईने शोधला मार्ग
रात्रशाळेत घातले
इच्छा तिथे मार्ग
दमून जायची बाय
कामं करुन करुन
इच्छाशक्तीच प्रबळ
झोप दिली सोडून
आलिया भोगासी अशी
झालली गं बाय सादर
शिकून मोठी होऊन
गाठले किर्ती शिखर
