भूक
भूक
आस आई सांगू तुला
वेगवेगळ्या गोष्टींची
जवळ बसून माझ्या
गप्पा मारशील आई?
गो ष्टी पऱ्यांच्या आई
सगळेजण ऐकती
मला मात्र आई बाबा
ताडताड का बोलती?
मोठे चित्र रंगवणे
खूप आवडेल मला
कसे परवडेल गं
आपल्या गरीबीला?
माहिती आहे गं मला
नाहीये नशिबात माझ्या
वणवण करतेस
भूक माझी भागवण्या!!
दीड वीत पोटासाठी
काबाडकष्ट करसी
पांग फेडीन तुझे
मोठा झाल्यावरती!!
