STORYMIRROR

Jyoti gosavi

Abstract Others

3  

Jyoti gosavi

Abstract Others

माझी नऊवारी लय भारी

माझी नऊवारी लय भारी

1 min
196

कांचीपुरमची कांजीवरम

 मुलायम गर्भरेशमी काठ 

बनारसी शालू वरती

 बघावा वेलबुट्टीचा थाट


 जिच्यावर भौमितिक आकार

 ती तेलंगणातील पोचंपल्ली

  टोप पदरी लुगडं म्हणजे

  ईल्केकलूची इरकली 


 टसर, मुग्गा उफाडा 

  बंगालची बालू चेरी 

  माहेश्वरची माहेश्वरी

 काश्मिरची कशिदाकारी 


कोईमत्तूरची कोईमत्तूरी

 राजस्थानची बांधणी

 जॉर्जेट शिफॉन चंदेरी

 आणि येवल्याची पैठणी 


खादी गढवाली कॉठा साडी

  तंछोई धर्मावरम धूप छाव

 घेतल्या साड्या तरी

 कमी होत नाही हाव


 राजस्थानी मारवाडी गुजराती 

साड्यांचे प्रकार तरी किती

 टसर पटोला पेशवाई

 घेणाऱ्यांची लगीनघाई


 पैठणीवर नाचतात राघू मोर

 चंद्र कळेवर चंद्राची कोर

 नऊवारी संस्कृती महाराष्ट्राची 

 शान आपली पैठणची पैठणी

 अभिमानाने जपावी ती

सर्व साड्या तील हिरकणी


 कितीही लावल्या

 साड्यांच्या हारी

 तरी माझी नऊवारी

 लय भारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract