चला जाऊ मतदानाला
चला जाऊ मतदानाला


नेहमीच राया तुमची घाई
नका लावू गठुड बांधायला
जाऊ दे मला मतदानाला
आधी जाऊ दे मला मतदानाला
पाच वर्षाचा सण हा मोठा
आनंदाला नाही तोटा
उभी आहे मी रांगेला
येऊ कशी तशी मी नांदायला
करू दे मतदान माझ्या नेत्याला
मगच मी येईन नांदायला
पाच वर्षांनी येतो हा सणं
दवडायचा नाही बघा हा क्षण
लोकशाहीचे करू रक्षण
निवडून देऊ आपल्या नेत्याला हो
मग मी येईल नांदायला <
/p>
जाऊ चला मतदानाला हो
जाऊ चला मतदानाला
घेणार नाही कोणाच्या नोटा
बटन दाबणार नाही नोटा
भुलणार नाही प्रचारा खोटया
निवडून देऊन सच्चा नेता
मजबूत करू लोकशाहीला
जाऊया चला मतदानाला
बोटाला माझ्या लावीन शाई
गडबड मतदानाची बाई
तुम्हाला एवढी का हो घाई
टकूर तुमचं काम करीत नाही
बजावीन माझ्या अधिकाराला
मग मी येईन नांदायला
मग मी येईन नांदायला हो
मग मी येईन नांदायला