जय लोकशाही
जय लोकशाही


या खंडप्राय देशात
जगातील सर्वात मोठी लोकशाही
ठोकशाही कधी झुंडशाही
आणि कायमच घराणेशाही
आजोबा आई मुलगा
सारेच होतात पंतप्रधान
भारतरत्न साऱ्यांनाच
काय देशाचे भाग्य महान
सर्व धर्म पंथ समान तरी
370 जात नाही
(हे वाक्य मात्र मोदीजींनी
खोटे पाडले कविता त्या आधीची आहे)
भाषा धर्म प्रांत जात
जाता जाता जात नाहीत
कधी दंगली होतात
कधी घडवल्या जातात
सत्तेसाठी स्वार्थापोटी
देश देखील विकायला काढतात
चांगल्या वाईटाचे येथे
कोणालाच भान नाही
येथे नांदते जगातील
सर्वात मोठी लोकशाही
तरीही लोकशाही लढते आहे
कधीकधी ती रडते आहे
पाच वर्षातून एकदा
मतदार राजा
बाकी सर्व दिवस
डोईवर करांचा बोजा
येथे कोणाला वेळ आहे
रोजच जगण्याची लढाई
द्या कोणालाही मत
व्हा मोकळे आणि म्हणा
जय लोकशाही