STORYMIRROR

वर्षा अरगडे

Classics

3  

वर्षा अरगडे

Classics

पदर

पदर

1 min
298

आईच्या पदराशी

ओळख माझी खूप जुनी

ती झाकत असे मला

जेव्हा मी तिच्या ओटीत

स्तनपानाचा आनंद घेई

करूनी तिच्या पदराशी खेळी

घरी दारी फिरताना

पदर तिचा माझ्या बोटी

तनामनाच्या आसवांना

ती तिच्या पदरानी टिपी

भिजलेल्या हातांना

मी तिच्या पदराला पुसी

कुठूनही आलो तरी

शोधी तिच्या पदराचा माग हो

जगात कुठेही गेलो तरी

पदराच्या गोधडीची साथ हो..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics