STORYMIRROR

वर्षा अरगडे

Others

3  

वर्षा अरगडे

Others

अंक एक

अंक एक

1 min
216

रमलेल्या हया मनाला का लागे काहूर अनामिकाची

चाहूल घेतली त्याने वर्तमानातून भूत भविष्याची

विचलित होते लक्ष त्याचे पायाखालच्या मार्गातून

नजर शोध घेते न दिसलेल्या अवकाशातून

कुठल्या चुंबकाच्या क्षेत्रात मी अशी अडकले

जाणता अजाणता त्या दिशेला मी खेचले

त्या तिथल्या वेशीवर नव्या जुन्याचे झाले द्वंद्व

अंतरीच्या सागरात घुसळले का मंथन युद्ध

न जाणो हा असावा दैवाचा संकेत

नव्या अध्यायाचा हा असावा कदाचित अंक एक


Rate this content
Log in