STORYMIRROR

वर्षा अरगडे

Romance

3  

वर्षा अरगडे

Romance

ती अन् तो

ती अन् तो

1 min
220

तिची अन् त्याची ठरली भेट

क्षितिजाच्या त्या टोकाला

दिवस रात्रीच्या मिलनाला

चंद्र सूर्याच्या साक्षीला

तिच्या अन् त्याच्या भेटीमध्ये

तिच्या प्रश्नाला उत्तर त्याचे

तिच्या रूसव्याला हास्य ह्याचे

मुक संभाषण त्या डोळ्यांचे

लाजरे संकेत आल्हाद स्पर्शांचे

तिच्या अन् त्याच्या भेटीनंतर

हसू विरले आसु बनुनी

प्रश्न उद्भवले शंका बनुनी

विरह वेदनेची ठेच लागुनी

जन कुजबुजली कानामधुनी

" ती ....अन्.... तो"


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance