मी
मी
पहिल्यांदाच मला 'मी' अनोळखी झाले
मी विषयी बोलताना पुरती भांबावले
इतकं कसं मी 'मी'ला गृहीत धरलंय
बाकी सगळ्यांना मात्र तोलून धरलंय
आता मात्र मी 'मी' ला आत शोधते आहे
नको असलेल्या विचारांचं ट्रॅफिक बाजुला सारते आहे
'मी' ची जागा आत ब्लँक आहे
तिला भरण्याचा आता प्लॅन आहे
सगळ्यात पहिले 'मी'ला योग्य स्थान देणार आहे
त्यासाठीच आखला ॲक्शन प्लॅन आहे