लाॅकडाऊन दुपार
लाॅकडाऊन दुपार
रविवारच्या दुपारला सोन्याची झळाळी
दडून बसलीये काळी सावली
घराच्या पापण्या वामकुक्षीला निजलेल्या
ओठांच्या कड्या आतून लावलेल्या
कुंपणाने गुंफलेत हातात हात
उंबऱ्याने पाहिली ये पाऊलाची वाट
रस्त्याने वाहतंय मृगजळाचे पाणी
डोळ्यांनी गायली ये भावनांची गाणी
