शब्द
शब्द
शब्दांनी रेखियले
स्वप्न चित्र अंतरी ।
तनामनातून मोहरला
कस्तुरी गंध सभोवरी ।।
शुद्ध जाणीवेच्या तरंगे
जोडले नाते मनोमनी ।
साथ ही निभवावया
अक्षरे वेचिले निक्षूनी ।।
कल्पनेच्या त्या बीजाने
वेष्टियले स्वये विचारांनी ।
सुरवंटाचे झाले पाखरू
घेऊन स्वरूप शब्दांनी।।