पुण्यस्मरण
पुण्यस्मरण
देशासाठी कुटुंबास हे विसरले
घरावर त्यांनी तुळशीपत्र ठेविले
स्वराज्याचे मनात वेड लागले
निज शीर तळहाती घेऊनी
स्वातंत्र्यस्तव वीर हे लढले
हसत अन आनंदाने, यांनी
भारत भूमिसाठी प्राण अर्पिले
विनंती माझी स्वातंत्र्यदिनी,
साऱ्या प्रिय देशबंधवांना..
विसरू नका...तुम्ही दोस्त हो,
आपुल्या शूर क्रांतिवीरांना..
"मेरी झाशी नाही दूंगी"
ब्रिटिशांना ठणकावणाऱ्या
मर्दानी राणी झाशीला..
पुत्रांचे बलिदान देणाऱ्या ,
बादशाह बहादूर जाफरला..
सत्तावनचा उठाव करणाऱ्या,
सैनिकवीर मंगल पांडेला..
विसरू नका, तुम्ही दोस्त हो,
आपुल्या शूर क्रांतिवीरांना..
वंदे मातरमचा जयघोष करत,
फासावर जाणाऱ्या भगतसिंग,
राजगुरू आणि चाफेकर बंधुंना..,
पंधराव्या वर्षी फाशी जाणाऱ्या ,
बंगालच्या बालक खुदीरामाला ..
स्वातंत्र्यास्तव फौज उभारणाऱ्या,
देशभक्त चंद्रशेखर आझादांना,
इन्कलाब झिंदाबाद म्हणत
फाशी जाणाऱ्या मदनलाल धिंग्रांना..
विसरू नका तुम्ही दोस्त हो,
आपुल्या वीर क्रांतिवीरांना..
केसरीतून स्वराज्याची गर्जना करणाऱ्या,
पुण्याच्या टिळक लोकमान्यांना..
भर तारुण्यात, काळ्या पाण्याची,
अंदमानात जन्मठेप भोगणाऱ्या,
स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर सावरकरांना..
"तुम मुझे खून दो...मै आजादी दूंगा,"
सांगणाऱ्या आझाद हिंद फौजेचे ,
नेताजी सुभाषचंद्र बोसांना,
जालीयनवाला हत्याकांडाच्या,
क्रूर डायर चा बदला,
घेणाऱ्या उधमसिंहाना ..
विसरू नका तुम्ही दोस्त हो,
आपुल्या वीर क्रांतिवीरांना...
शस्त्राविना अहिंसेने लढणाऱ्या
राष्टपिता महात्मा बापूजींना..
"सायमन परत जा "म्हणुनी,
छातीवर लाठीचे वार घेणाऱ्या,
लजपतरायांच्या लालांना ..
स्वदेशीचा मंत्र देणाऱ्या,
बंगालच्या बिपीनचंद्र पालांना...
विसरू नका तुम्ही दोस्त हो..
आपुल्या वीर क्रांतिवीरांना..
अखंडते साठी झटणाऱ्या,
लोहपुरुष सरदार पटेलांना..
शांतीचा संदेश देणाऱ्या,
शांतिदूत चाचा नेहरूना..
स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या ,
महात्मा ज्योतिबा फुलेंना..
समतेसाठी सदैव झटणाऱ्या,
घटनाशिल्पकार बाबासाहेबांना..
विसरू नका तुम्ही दोस्त हो..
आपुल्या वीर क्रांतिवीरांना..
बल सागर भारताचे स्वप्न,
पहाणाऱ्या साने गुरुजींना...
मुंबईच्या बावीस वर्षीय,
कोवळ्या वीर बाबू गेनूला..
स्वराज्य,स्वाभिमानाची मुहूर्तमेढ,
करणाऱ्या छत्रपती शिवरायांना ...
विसरू नका तुम्ही दोस्त हो
आपुल्या वीर क्रांतिवीरांना..
अगणित माहित नसलेल्या
अनाम स्वातंत्र्य वीरांना
स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पिले
विस्मृतीच्या ते पडद्या मागे गेले..
नाही लाविली त्यांच्या साठी,
कोणी चिरा कोणी पणती..
त्या अनाम सर्व वीरासाठी
आज कर आमुचे जुळती..
स्मरा सदा या शुरविरांच्याच्या,
तुम्ही त्यागाला नी बलिदानाला..
विसरू नका तुम्ही दोस्त हो,
आपुल्या शूर क्रांतिवीरांना..
वंदे मातरम..... जयहिंद
