नातं
नातं
प्रेमबंधन दोघांचे
म्हणतात नातं..
जीव अडकवे
शेवटीही सरणात..
आई अन बाप
त्याचे सर्वं अंश..
कधी नका आणू
नात्यात व्यवहार..
भाऊ अन बहीण
आहे ते सहोदर..
विसरु नका नाते
गेले कुणी दूर..
सौं. चे गोड नाते
जुळते लग्नाने..
अर्धांगिनी खरंच
होते सहवासाने..
मैत्रीचे मात्र नाते
नात्यात ते श्रेष्ठ..
आपोआप जुळे
ना जेष्ठ ना कनिष्ठ..
जेव्हा कुठंलच
नाते ते नसते..
माणुसकीचे नाते
तेथे जन्म घेते..
जपा सर्व जण
असणाऱ्या नात्यांना..
नात्यांनीच नाथ
नसता सर्वं अनाथ..
शेवटी एक नाते,
ईश्वराशी जडते..
अद्वैताचा अर्थ
ते सांगून जाते..
