वेळ!!!
वेळ!!!
घड्याळ खूप हळू चालते
जेव्हा कशाची वाट पाहतो..
वेग त्याचा खूप भासतो
जेव्हा कुठे तो उशीर होतो..
दुःखात जेव्हा कुणी बुडाले
टिकटिक आपोआप थांबली..
सुख आनंदाच्या वर्षावात
ती कुणा कधी ना ऐकू आली..
वेदना जेव्हा जिव्हारी असते
वेळेला ही खिळ लागते..
कंटाळा जीवनी अंतिम येता
वेळ खूप दुर दूर भासते..
घड्याळ वाटते आहे खोटे
ग्रह गोलांचे फक्त्त वेग दर्शवे..
वेळ कशी ही त्या वेळेवर
मनावरच अवलंबून असतें ..
सदा प्रफुल्लित मन असावे
दुःखाला सहज विसरावे..
वेळ नकळत दासी होईल
वेळेवर राज्य प्रस्थापित व्हावे..
