शिशीर
शिशीर
आभाळातून भुरभूर,
शुभ्र हिमकणांचा सडा..
शून्याखाली गेला पारा,
पांढऱ्यात हरवे हिरवा..
गोठावणारी थंड थंडी
न दिसें कुठे चिटपाखरू..
सर्वंजण घरात दडले,
निर्मनुष्य वाटा न वाटसरू..
पान फुलांची गळती
निसर्गाचा नियम मान्य
नव्या पल्लवा साठी
झाडें झाली निष्पर्ण..
जाता सृजनशील वर्षा ,
गोठवे पाणी शिशीरा
ऋतूचे सौंदर्य आगळे
धरेवर ते वेग वेगळे..
ऋतू मागुनी ते ऋतू
निसर्गचक्र हे निरंतर
नवंपालवीच्या कौतुका
सदा तत्पर तो वसंत
