भेट
भेट
हिमालयाच्या शिखरावरती
सोनेरीवर्ख कुणी लाविला..
रविकिरणांनी अतिसुंदर
सुवर्णकांचन योग घडविला..
हिरण्यासम तेजस्वी भास्कर
पूर्वेला नित्य उगवला..
पश्चिमच्या क्षितिजावरती
नभी शशी भेटीस थांबला..
भेट द्वयिंची समोरासमोर
क्षितिजावर अवचित एकदा..
ईश्वरी भेट ती या गोलांची,
जीवन असे ते आम्हाला...
हिम टोपीचे करडे डोंगर
हिरवेगार तयांचा पायथा..
स्वेटरातही पहाटेस झोंबला
अतिशीतल जोऱ्याचा वारा..
असे सुंदर दृश्य पाठवूनी
प्रकाश आनंद वाटतो..
शब्द नकळत ओसंडून वाहे
अंतरंगी आनंद तो नाचतो..
भेट आनंदाची नित्य व्हावी
ही सर्वांची असे कामना..
मनात आपुल्या दडला आहे
शोधता सापडतो तो मना..
